About Us

मी अभिजित हिंदुराव माने

रा. गोळेश्वर ता. कराड जि. सातारा

मला एका प्रगतशील शेतकरी कुटुंबाचा वारसा लाभला आहे. वडिलोपार्जित लाभलेला शेती हा मुख्य व्यवसाय...

आम्ही आमच्या शेतीमध्ये नवनवीन आधुनिक प्रयोग करत असताना, गांडूळ खत, शेणखत, जीवामृत यांसारख्या खतांच्या वापराला प्राधान्य देतो. आमच्या शेतात ऊस, भात, भुईमूग, हरभरा, गहू यासारखी पिके घेतो. जर पिकवणारे आपण आहोत, तर आपल्या मालाची बाजारपेठ आपणच सर्व शेतकऱ्यांनी मिळून निर्माण केली पाहिजे, तरच शेतकऱ्याला आणि त्याच्या मालाला किंमत राहील. यामधूनच आपण एक पाऊल पुढे येत " उद्योगशिल शेतकरी ते ग्राहक " या संकल्पनेतून "भातशेती इंद्रायणी" या नावाने बिगर पॉलिश असा, पौष्टीक, सुगंधी, निरभेसळ व नैसर्गिकरित्या तांदळामध्ये असणारे सर्व जीवनसत्वयुक्तक अस्सल इंद्रायणी तांदूळ आपल्या समोर घेऊन येत आहोत.


• पॉलिश न केलेला तांदूळ ( बिगर पॉलिश )
• नैसर्गिक तेलकट रंग
• नैसर्गिकच वासाला सुवासिक व स्वादाला चविष्ट
• पॉलिश न केलेला तांदूळ आरोग्यास पौष्टीक
• तांदळामध्ये नैसर्गिकरित्या असणारी जीवनसत्वे व खनिजे मिळतात.
• स्वास्थ्य निरोगी राहण्यासाठी पॉलिश न केलेला तांदूळ वापरावा.

• योग्य दरात “ उद्योगशील शेतकरी ते ग्राहक विक्री "

• म्हणूनच सर्वांच्या पसंतीचा....

 

 

 

 

 

 

 

 

 

Made with ❤ in India by NiksLogy